ऐश्वर्या रायसारखं तुम्हीही मासे खाऊन सुंदर व्हा अन कोणाला पटवायचे ते…. भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

0
1
vijaykumar gavit aishwarya rai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय नेतेमंडळी त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अनेक सभा-कार्यक्रमांमधून उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु बोलण्याच्या भरात आपण काय बोलतोय याच भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना धुळ्यात घडली असून सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग कोणीही पटवूनच घेणारच असं गावित म्हणाले.

धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना विजय कुमार गावित म्हणाले, मासे खाल्ले कि बाईमाणूस चिकणे दिसायला लागतात आणि डोळेही अगदी तरतरीत होतात. त्यामुळे कोणीही पटवूनच घेणारच. तुम्ही ऐश्वर्या रायला बघितलं ना? ती समुद्रकिनारी रहायची आणि रोज मासे खायची बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असं विजयकुमार गावित यावेळी म्हणाले. माशाच्या तेलामुळे आपली त्वचाही चांगली दिसते. तसेच त्या तेलामुळे डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. असंही गावित यांनी म्हंटल

गावित यांनी ऐश्वर्या रायचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मंत्र्यांनीच अशा प्रकारची विधाने केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावेळी मंचावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. आता राज्यातील विरोधक विजय कुमार गावित यांच्या या विधानावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे आता पाहावं लागेल.