भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार : विक्रम पावसकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आगामी मगरपालिका निवडणुकीमुळे सातारा येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. दरम्यान आज सातारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातारा शहरातील प्रमुख पदाधिकारी, नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार यांची महत्वाची बैठक सातारा येथे पार पडली. यावेळी भाजप मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार आणि सातारकरांच्या विकासाचा संकल्प राबवणार, असे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी म्हंटले.

यावेळी विक्रम पावसकर म्हणाले की, पक्षाची ध्येय धोरणे आंदोलने कार्यक्रम सातारा शहरांमध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडले जात आहेत. येत्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील. त्याचबरोबर सातारा शहर कार्यकारिणीने जी एकोणीस मुद्द्यांची सूची तयार केली आहे त्यातील माहिती आपल्या प्रभागात फिरून उमेदवारांनी गोळा केली तर त्यांना निवडणूक अत्यंत सोपे जाईल. लवकरच सातारा शहर निवडणुकीसाठी कोअर कमिटीची घोषणा केली जाईल आणि या कमिटी मार्फत सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. पक्षाचे केलेले काम, दाखवलेली निष्ठा, आंदोलनातील कार्यक्रमातील उपस्थिती आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी दिली जाईल.

सातारा येथे पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला प्रदेश कार्यकारणी सदस्य अमितजी कुलकर्णी, दत्ताजी थोरात, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते सातारकरांच्या विकासाचा संकल्प या संकल्प पेटीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्तविक करताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केले.