हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vikramaditya Vedic Clock) आपल्या भारतात आजपर्यंत विविध चमत्कार, गूढमय आणि रहस्यमय ठिकाणं, वास्तु आढळल्या आहेत. यांपैकी बऱ्याच गोष्टी लोकांना माहित आहेत. मात्र, नुकतीच भारत नव्हे तर संपूर्ण जगाला एक अनमोल भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी उज्जैनमध्ये एका अशा घड्याळाचे लोकार्पण केले आहे ज्यामध्ये ६० मिनिटांचा नव्हे तर ४८ मिनिटांचा एक तास असतो.
होय, तुम्ही बरोबर वाचताय. पीएम मोदींच्या हस्ते विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. हे घड्याळ वैदिक असून यामध्ये मिनिट आणि तासाचा काटा नसणार आहे. तर हे एक डिजिटल घड्याळ आहे. ज्यामध्ये ६० मिनिटांचा एक तास नसेल. अर्थात हे घड्याळ २४ तासाचं नसणार आहे. आहे ना वेगळं? चला तर या वेगळ्या घड्याळाविषयी सविस्तर माहिती घेऊया.
जगभरातील एकमेव वैदिक घड्याळ (Vikramaditya Vedic Clock)
संपूर्ण जगभरातील विक्रमादित्य हा पहिले वैदिक घड्याळ आहे. ज्याची निर्मिती ही ८५ फीट टॉवरची करण्यात आली आहे. हे घड्याळ वैदिक माहिती देणारं एक डिजिटल घड्याळ आहे. महत्त्वाचं म्हणजे, या घड्याळाचं एक ॲपदेखील आहे.
विक्रमादित्य वैदिक घड्याळात अशी समजते वेळ
हे घड्याळ वैदिक असून इतर कोणत्याही घड्याळापेक्षा फार वेगळे आहे. त्यामुळे इंडियन स्टॅन्डर्ड टाइम (IST) आणि ग्रीनविच मीन टाईम (GMT) यांसह पंचांग आणि मुहूर्तदेखील हे घड्याळ सांगणार आहे.
६० मिनिटांचा नव्हे ४८ मिनिटांचा १ तास
(Vikramaditya Vedic Clock) विक्रमादित्य वैदिक घड्याळात १ तास हा ४८ मिनिटांचा असतो. सर्वसाधारण घड्याळांमध्ये ६० मिनिटांचा १ तास असतो. मात्र, या घड्याळात १ तास पूर्ण व्हायला १२ मिनिट कमीच लागतात. हे घड्याळ मुहूर्त, सूर्य- चंद्र ग्रहण, तिथी, शुभ मुहूर्त पर्व, उपवास, सण, भद्रकाल यांचीसुद्धा माहिती देतं.
२४ नव्हे तर ३० तासाचं घड्याळ
विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे २४ तास नाही तर ३० तासाची वेळ दर्शवतं. कारण हे घड्याळ सूर्योदयापासून – सूर्यास्तापर्यंतची सगळी वेळ दाखवतं. त्यामुळे इतर सर्वसामान्य घड्यांपेक्षा हे घड्याळ नक्कीच वेगळ ठरत आहे.
कोणी बनवलं विक्रमादित्य वैदिक घड्याळ?
जगभरातील पहिलं वैदिक घड्याळ म्हणजेच विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहे. या डिजिटल घड्याळाच्या अँपचे नाव आरोह श्रीवास्तव असे आहे. (Vikramaditya Vedic Clock) या घड्याळात तुम्हाला ना केवळ वेळ तर हवामानाविषयी देखील माहिती मिळणार आहे.
इंटरनेट कनेक्शन
विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे डिजिटल घड्याळ आहे. त्यामुळे हे घड्याळ इंटरनेट आणि जीपीएससोबत जोडलेले आहे. यामुळे अर्थात ॲपच्या माध्यमातून हे घड्याळ डाऊनलोड करता येईल. तसेच यामध्ये वॉच टॉवर टेलिस्कोप देखील लावण्यात आला आहे. (Vikramaditya Vedic Clock)