सांगलीत मोठ्या घडामोडी!! भाजपच्या माजी आमदाराचा विशाल पाटलांना पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल पाटील (Vishal patil) याना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे याच विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भेट शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut0 यांनी भेट घेतली होती, त्यामुळे ते ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना पाठिंबा देतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी आज विशाल पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

खरं तर सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच विलासराव जगताप यांचा थेट विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभेसाठी संजयकाका पाटील याना उमेदवारी देऊ नये अशी मागणी विलासराव जगताप यांनी केली होती, मात्र पक्षाने त्यांची मागणी विचारत न घेता संजयकाका पाटील याना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तेव्हापासूनच विलासराव जगताप हे पक्षात नाराज होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विलासराव काय भूमिका घेणार? कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष्य होते. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊतांनी मागील आठवड्यातच त्यांची भेट घेतल्यानंतर विलासराव जगताप चंद्रहार पाटलांना आपला पाठिंबा देतील असं बोललं जात होते, मात्र त्यांनी विशाल पाटील याना बळ (Vilasrao Jagtap Support Vishal Patil) देणार असल्याचे जाहीर केलं आहे. विलासराव जगताप यांच्या या निर्णयानंतर संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटील या दोघांनाही निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

विलासराव जगताप यांचे पत्र जसच्या तस,
महाशय,
भारतीय जनता पार्टीमध्ये मी, आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले आहे. परंतु पक्षाने त्याची दखल न घेता आलिकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमुल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आले आहे. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्ष्याच्या जबाबदारीतुन मुक्त होतो. तरी मी आपल्या भा.ज.पा. पक्षाचा राजीनामा देत आहे.

कळावे
आपला
श्री विलासराव ना. जगताप