अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका युवकाने अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा (Self-immolation) प्रयत्न केला. तो स्वतःला पेटविणार एवढ्यात पोलिसांची एंट्री झाली. यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळं युवकाचे प्राण वाचले आहेत. मयूर हरिभाऊ काळे असे आत्मदहन करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाने गावातील शेतीचा वाद आणि दारू दुकानाच्या वादातून आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिटी कोतवाली पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.

हरीभाऊ हा मूळचा राजंदा येथील रहिवासी आहे. त्याचा काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरु आहे. तसेच त्याची दारू दुकानावरून भानगड सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पण, याची दखल का घेतली जात नाही, याचा राग हरिभाऊला आला होता. याच रागातून त्याने हे पाऊल उचलले आहे.

पोलसांनी घातली आंघोळ
अकोल्यात दुपारच्या सुमारास चांगलेच ऊन पडते. यात या युवकानं गोंधळ घातल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्याला पाण्याने स्वच्छ केले. त्याच्या अंगावरील डिझेलचा वास निघून जाईपर्यंत त्याला पाण्याने आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा शांत झाला. मात्र या सगळ्यांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

हे पण वाचा

इलेक्ट्रिक विमान ते चंद्रावर शहर… ; एलोन मस्क यांच्या डोक्यातील ‘या’ 5 कल्पनांचा तुम्ही विचारही केला नसेल

‘या’ 4 घरगुती उपायांनी मानेचा काळेपणा करा दूर

इथं एक पोरगी मिळेना अन् ‘या’ पठ्ठ्यानं चक्क 3 जणींसोबत केलं एकाच वेळी लग्न

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला राशिद खान

Leave a Comment