DHD च्या क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक; महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

Mineral Mining Trimli Crusher
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील त्रिमली येथील डीएचडी इंफ्राकॉन या खडी क्रशरचे मालक दत्तात्रय हणमंत देसाई यांनी ग्रामपंचायतीला नियमानुसार 3 टक्के महसूल देणे बंधनकारक असूनही गेल्या चार वर्षांपासून दिलेले नाही. शिवाय त्या बदल्यात नियमबाह्य क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतजमिनी नापिकी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी ग्रामस्थांनी एकत्रित येत आक्रमक पावित्रा घेतला असून क्रशर बंद करण्याची मागणी केली आहे.

त्रिमली येथील क्रशरमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सुमारे 30 ते 40 फुटांवर ब्लास्टींग होत असल्याने त्या ब्लास्टींगच्या तिव्रतेने राहत्या घरांना तडे गेले आहेत. शिवाय येथील जनावरांसह काही वयोवृद्ध ग्रामस्थांना जीव गमवावा लागला आहे. संबंधित क्रशरमधून निघणाऱ्या मालाची होत असलेली वाहतूक शाळे समोरूनच होत असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना दम्यासह अनेक आजार उध्दभवू लागले आहेत.

या गंभीर विषयावर महसूल विभागात कार्यरत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका क्रशर मालकालाच वाचविण्याची असल्याची दिसून येत आहे. तर तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तथा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी त्यासंबंधी यासंदर्भात लक्ष केंद्रित करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्रिमली ग्रामस्थ आणि आरपीआयचे तालुका अध्यक्ष गणेश भोसले यांनी केली आहे.