कोल्हापूर भाजपच्यावतीने विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने आज बिंदू चौक येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अमर राहे सावरकर अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी बोलताना प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ज्या क्रांतीकारकानी स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले यांचे स्मरण ठेवणे आपले आद्य कर्तव्य आहे. सावरकरांनी भाषा शुद्धीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मराठी भाषेला काही नविन शब्द बहाल केले. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता भारत देशामध्ये पुन्हा एकदा सावरकरांच्या विचारांची गरज आहे. युवकांनी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा आदर्श घेऊन देशाबद्दलची राष्ट्रभक्ती अंगीकारली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबोबर आज विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला असता या विद्यमान सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला याचा निषेध करीत असल्याचे नमूद केले.

तसेच सावरकरांच्या बद्दल सातत्याने आक्षेपार्ह लिखाण करणा-या कॉंग्रेसचे मुखपत्र असणा-या “शिदोरी” या मासिकावर बंदी घालावी अशी मागणी अशोक देसाई यांनी केली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गणेश देसाई, रविंद्र मुतगी, संतोष माळी, भरत काळे, प्रदीप उलपे, आशिष कपडेकर, अशोक लोहार, प्रसाद मुजूमदार, गणेश चिले, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंच चे उपाध्यक्ष एस.के.कुलकर्णी, राजेंद्र सूर्यवंशी, राजेश बुधले, मनिष कुलकर्णी, विजय आगरवाल, विवेक वोरा, दिग्विजय कालेकर, अक्षय निरोखेकर सचिन सुतार, बापू राणे, तानाजी निकम, रजनी भुर्के, सुनिता बरामते, लालासो पवार, दिलीप बोंद्रे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment