हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करीत अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली. तसेच निषेध करण्यासाठी 15 ते 20 हजार लोक मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून अमरावतीतील जयस्थभ चौकातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या 20 ते 22 दुकानांची तोडफोड आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पाडल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मोर्चे काढले गेले. त्याचे पडसाद अमरावती, नांदेड, भिवंडी या ठिकाणीही उमटले आहेत. अमरावतीत आज सकाळी मोठ्या प्रमाणात एकत्रित आलेल्या जमावाने 20 ते 22 दुकानांची तोडफोड केली आहे. या तोडफोडीत दुचाकी, चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मोठ्या संख्येने एकतरी आलेलया जमावाला पांगविण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. मात्र, पोलीसांवरही दगडफेक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित येऊन जोरदार घोषणाबाजिही याठिकाणी सध्या करत आहे. कोणत्याही परिस्थितीत तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.