Viral Video : अचानक हवेत उडू लागला रिक्षाचालक आणि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून यामध्ये रिक्षाजवळ उभा असणारा एक व्यक्ती अचानक काही फूटांपर्यंतचे अंतर उडून एका महिलेवर पडल्याचे दृष्य दिसत आहे. अनेकजण या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं आणि हा व्यक्ती एवढ्या लांबवर कसा काय फेकला गेला यासंदर्भातील चर्चा सोशल नेटवर्किंगवर करत आहे. मात्र बेंगळूरु मिररने दिलेल्या वृत्तानुसार हा सर्व प्रकार एका तारेमुळे घडल्याचे वृत्त दिलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून हे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहे. आधी आपण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहूयात…

नक्की काय घडलं?

बेंगळुरुमध्ये १६ जुलै रोजी हा सर्व प्रकार घडला. या अपघातामध्ये ४२ वर्षीय सुनिता के. या जखमी झाल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार रिक्षाजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या पायामध्ये वायर अडकल्याने हा अपघात झाला. येथील टीसी पालया रोडवर पडलेली वायर रिक्षाचा पुढच्या चाकामध्ये अडकल्याने चालक खाली उतरुन ती वायर काढत होता. मात्र हे करत असतानाच रस्त्यावर पडलेल्या या वायरवरुन एक मोठी गाडी गेली. ज्यामध्ये ही वायर अडकली आणि हा चालक त्यामुळे खेचला गेला. वायर अगदी जास्त शक्तीने ओढली गेल्याने हा चालक काही फूट अंतर उडाला आणि बाजूने चालणाऱ्या सुनिता यांच्यावर जाऊन आदळला. सकाळी साडेअकराच्या सुमार हा सर्व प्रकार घडला.