हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमधील प्रतापगडचा येथील भाजप नेत्याचा एका महिलेसोबतचा अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपाच्या त्या विभागाील ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष असलेले कैलास गुर्जर यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या गुर्जर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. त्या कार्यक्रमाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. काही लोक मुद्दाम त्या व्हिडीओचा वापर करून माझी प्रतिमा मलीन करत आहेत”, असं स्पष्टीकरण गुर्जर यांनी दिलं आहे.
Caution, viewer discretion advised.
Kailash Gurjar , the @BJP4India president for rural division of Chittorgarh engaged in lap dance during a social gathering program. pic.twitter.com/lb4YRUH1ig
— Arvind Chauhan 💮🛡️ (@Arv_Ind_Chauhan) January 27, 2021
२३ नोव्हेंबरला राजस्थानच्या निंबाहेडा-मांगलोर या ठिकाणी हा प्रकार घडला. याबाबत बोलताना गुर्जर यांनी सांगितले आहे की मी माझ्या कुटुंबासोबत नृत्य करत होतो. तो आमच्या परिवाराचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. माझा डान्स अनेकांनी रेकॉर्ड केला. बहुतांश लोकांनी या डान्सकडे वाईट नजरेने पाहिले नाही. पण काही लोक मुद्दाम या व्हिडीओचा वापर माझ्याविरोधात करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’