हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) कुणाचं वय किती आहे याचा आणि झोका खेळण्याचा काहीही संबंध नाही. कारण प्रत्येकजण लहानपणी किमान एकदा तरी झोका खेळलेला असतो. गावाकडे तर लहान मुले झाडाच्या फांद्यांचा वापर करून झोका खेळतात. झोका खेळण्यात एक वेगळीच मजा आहे. जी झोका खेळल्याशिवाय समजत नाही. कोणत्याहीबागेत लहान मुलांसाठी झोका हा असतोच. त्यामुळे मुलं अगदी आनंदाने झोका खेळताना दिसतात. दरम्यान, गेल्या काही काळात झोका खेळण्याचा एक नवा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमच्याही काळजात धस्स होऊ शकते.
आजकाल अनेक पर्यटन ठिकाणी उंच डोंगरावर, खोल दरीच्या टोकावर झोके असल्याचे पहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात झोका घेण्याची मजा घेता यावी म्हणून केलेला हा अट्टाहास. अशा या झोक्यांवर बसने म्हणजे जणू साहसी खेळ. त्याचसोबत निसर्गरम्य ठिकाणी झोक्यावर फोटोशूटचीदेखील मजा घेता येते. असे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच झोक्याचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या मित्रांचा एक (Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत झोका खेळताना मित्रांसह एक अपघात होतो. जो पाहून आपले हात पाय थरथरायला लागतात.
झोका देता देता घसरला आणि … (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ crane.rasool नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका उंच टेकडीवर एक झोका दिसतोय. ज्यावर एक व्यक्ती आनंदाने बसल्याचे आपण पाहू शकतो. त्या व्यक्तीसमोर एक खोल दरी आहे. मात्र, या दरीच्या भीतीपेक्षा ती व्यक्ती झुल्याचा अधिक आनंद घेत आहे. या (Viral Video) व्हिडीओत झोक्यावर बसलेल्या व्यक्तीला त्याचा मित्र झोका देताना दिसत आहे. पण झोका देताना तो स्वत:चा आणि मित्राचा जीव धोक्यात टाकतोय. झोक्यामागील व्यक्ती जोरात झोका देते आणि तेवढ्यात त्याचा पाय एका दोरीत अडकून तो जमिनीवर पडतो.
ज्यामुळे तो झोक्यासोबत ओढला जातो. झोक्याला जोरात ढकल्यामुळे तो उंच जातो आणि त्याला झोका देणारी व्यक्ती काही क्षण हवेत लटकताना दिसते. दरम्यान, झोका पुन्हा मागे येतो आणि यावेळी लटकलेली व्यक्ती पुन्हा जमिनीवर आदळते आणि झोक्याला अडकलेल्या दोरीतून त्याचा पाय निसटतो. या सगळ्यात झोक्यावर बसलेल्या व्यक्तीला चांगलाच हिसका बसतो आणि झोका वाकडा होता.
दैव बलवत्तर
सुदैवाने या घटनेदरम्यान झोक्यावर बसलेली व्यक्ती आणि झोका देणारी व्यक्ती दोघांनाही कोणत्या प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाही. (Viral Video) या प्रकारात जीवितहानी होण्याची शक्यता दाट होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघांचाही जीव बचावला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे. साधारण २० दशलक्षाहून अधिक वेळा हा व्हिडीओ प्ले झाला आहे आणि २६ लाखांहून अधिक लोकांकडून त्याला लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘धोकादायक’ असे म्हटले आहे. तर काहींना हा प्रकार साहसी वाटलं आहे. दरम्यान काही नेटकऱ्यांनी, ‘असे प्रकार करण्याआधी १०० वेळा विचार करा.. परत परत जीव मिळत नाही’, ‘नशीब चांगलं म्हणून वाचले.. कुणीही अशी स्टंटबाजी करू नका’ असे म्हटले आहे. (Viral Video)