काळजाचा ठोका चुकवणारा Video; जोडप्याचा पॅराशूट रायडिंग करताना अचानक तुटला दोरखंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर देशभरातील अनेक नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जात आहेत. या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर अतिउत्साहातून अनेक दुर्घटना घडतात. अशीच एक घटना दीवमध्ये घडली आहे. याठिकाणी पर्यटनास गेलेलं एक जोडपं पॅराशूट रायडिंग करत असताना, त्यांचा अचानक दोरखंड तुटला आणि ते जोडपे समुद्रात पडले. हि घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित जोडप्याने लाइफ जॅकेट घातल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. लाइफ जॅकेटच्या मदतीनं संबंधित जोडपं समुद्र किनाऱ्यावर पोहोचलं. हि घटना दीव येथील नगवा बीचवर घडली आहे. हि घटना घडल्यानंतर अ‍ॅडव्हेंचर एजन्सी आणि पर्यटकांमध्ये मोठा वाद झाला आहे. यानंतर दुर्घटनाग्रस्त जोडप्यानं अ‍ॅडव्हेंचर ग्रुपविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेचा व्हिडीओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. पॅराशूट रायडिंग करत असताना अचानक दोरखंड तुटल्याने अ‍ॅडव्हेंचर बोटीवर मोठा गोंधळ उडाल्याचं संबंधित व्हिडीओत दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

IRCTC – तुमचे ट्रेनचे तिकीट हरवल्यास आता काळजी करू नका, रेल्वेच्या ‘या’ नियमांद्वारे तुम्हांला होईल मदत

Ration Card : आता घरबसल्या एका क्लिकवर बनणार रेशनकार्ड, कसे ते जाणून घ्या

Bank Holidays – ‘या’ शहरांमध्ये पुढील 5 दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्यांची लिस्ट पाहून करा महत्वाची कामे

Gold Price : आजचा सोन्या-चांदीचा दर काय आहे जाणून घ्या

राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली गाडी चोर; ‘या’ अनोख्या पध्दतीने चोरायची गाड्या

Leave a Comment