मुंबईच्या रस्त्यावर तरूणींचा फ्लॅश मॉब, ‘इन डा गेटो’ वर केला जबरदस्त परफॉर्मन्स

0
45
Flash Mob
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईसारख्या शहरात प्लॅश मॉब (Flash Mob) हे काही आता नवं राहिलेलं नाही. सीएसटी स्टेशनवर अचानक ‘रंग दे बसंती’ हे गाणं वाजलं आणि बघता बघता सारेच जण या गाण्यावर थिरकू लागले. मुंबईतल्या या पहिल्या वहिल्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. त्या पहिल्या फ्लॅशमॉबनंतर (Flash Mob) मुंबईभर तरुणांपासून, सिनियर सिटीझन्सपर्यंत अनेक ग्रुप्स हा प्रयोग करून पाहू लागले. सध्या असाच एक प्लॅश मॉबचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईच्या रस्त्यावर तरूणी एकत्र येत ‘इन डा गेटो’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मुंबईतल्या नरीमन पॉईंट टूडे इथे हा दमदार फ्लॅश मॉब (Flash Mob) करण्यात आला. मुंबईसारख्या शहरात, जगण्याच्या रोजच्या रहाटगाडग्यात, आपली संवेदनशीलता गंजत चालल्याचं हतबलपणे पाहाणं इतकंच हातात राहातं. बधीर करणाऱ्या रूटीनमध्ये अडकलेल्या मुंबईकरांना या तरूणींनी अचानक सरप्राईज करत हा फ्लॅश मॉब केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फ्लॅश मॉबचा (Flash Mob) व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘नरीमन पॉइंट टुडे, मुंबईकर.’ असं लिहित हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे पण वाचा :
बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा

शिवसेनेच्या आमदारांना गुजरात मध्ये मारहाण; संजय राऊतांचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिलाय, त्यामुळे ठाकरेंनी आता…; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here