Viral Video : ‘घर असावे घरासारखे…’; नितीन गडकरींच्या ‘त्या’ व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या ढंगाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमागे काही ना काही उद्देश असतो. कुणी प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडीओ शेअर करतात तर कुणी प्रेरणा देण्यासाठी. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ हे वेगवेगळ्या गोष्टींवर आधारलेले असतात. स्टंटबाजी, फूड फ्युजन, इतिहास – परंपरा, प्रेरणादायी सुविचार अशा विविध आशयाचे व्हिडीओ कायम सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मीडियावर नितीन गडकरी यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. कारण ते राजकारणातील एक कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व आहे. (Viral Video) दरम्यान, त्यांचा एक अत्यंत जुना व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये गडकरींनी घराविषयी एक सुंदर विचार मांडला आहे. या व्हिडीओतील त्यांचे विचार ऐकून कुणीही भारावून जाईल. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतोय.

गडकरींचा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

नितीन गडकरी यांचा हा व्हायरल व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये नितीन गडकरी बोलत आहेत की, ‘घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती… तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती.. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी.. अश्रुतूनही प्रित झिरपावे, नकोच नुसते पाणी..’. नितीन गडकरींच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या विचारांचे समर्थन करत त्यावर कौतुकाचा वर्षावदेखील केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम marathi_speaker नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘घर असावे घरासारखे’. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना गडकरींच्या विचाराचे समर्थन केले आहे. (Viral Video) एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘साहेब तुम्ही डायरेक्ट मनाला घाव घातलाय महाराष्ट्रातील एकमेव जनसेवा स्वतःच्या नाहीतर अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे गडकरी साहेब खरंच खरंच तुम्हाला खूप खूप आभार आणि धन्यवाद!!’ तसेच अन्य एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘महाराष्ट्रातील एकमेव स्वच्छ राजकारणी माणूस’.