हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेक चहा प्रेमींना चहासोबत टोस्ट, खारी खाणं आवडतं. ते बनतं कसं याची देखील कल्पना असते. मात्र सोशल मीडियावर टोस्ट बनवणाऱ्या कामगारांचा एक विडिओ जोरदार व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे टोस्ट खावं की नाही?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही राग येईल.
व्हिडीओमध्ये, कारखान्यातील काही कामगार जमिनीवर ठेवलेल्या टोस्टवर त्यांचे घाणेरडे पाय लावताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ते टोस्ट पॅक करताना चाटतानाही दिसतात. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कारखान्याच्या कामगाराने असे कृत्य मुद्दाम केले. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, नेटिझन्स कारखाना आणि त्याच्या कामगारांविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
एका बेकरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा
व्हिडीओ कुठला आहे माहिती नाही पण धक्कादायक आहे. pic.twitter.com/OJMU3dJHbb— Priya Lad (@priyalad6) September 16, 2021
हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तर व्हिडीओमधील लोकांवर कडक कारवाईची मागणी करत आहेत, काही जण त्यांना अटक करण्याची मागणीही करत आहेत.