Monday, January 30, 2023

233 रुपयांची बचत करून तयार करा 17 लाखांचा फंड, यामध्ये पैसे कसे आणि कुठे गुंतवायचे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । LIC आज आणि उद्या ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष योजना घेऊन येत आहे. LIC च्या जीवन लाभ योजनेद्वारे, तुम्ही दररोज 233 रुपये गुंतवून 17 लाख रुप यांचा फंड बनवू शकता. म्हणजेच, तुम्ही काही वर्षांत करोडपती होऊ शकता. LIC च्या योजना प्रत्येक कॅटेगिरीला लक्षात घेऊन तयार केल्या जातात. चला तर मग ‘या’ खास योजनेबद्दल जाणून घेउयात.

ही योजना मुलांच्या विवाह आणि शिक्षणासाठी आहे
जीवन लाभ (936) असे या पॉलिसीचे नाव आहे. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. यामुळे, या पॉलिसीचा शेअर मार्केटशी काहीही संबंध नाही. ही लिमिटेड प्रीमियम योजना आहे. मुलांची लग्न, शिक्षण आणि मालमत्ता खरेदीसाठी कंपनीने ही योजना बनवली आहे.

- Advertisement -

पॉलिसीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
>> LIC ची जीवन लाभ पॉलिसी नफा आणि संरक्षण दोन्ही देते.
>> 8 ते 59 वयोगटातील लोकं ही पॉलिसी घेऊ शकतात.
>> पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यंत घेतली जाऊ शकते.
>> किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागते.
>> कमाल मर्यादा नाही.
>> 3 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यावर कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.
>> प्रीमियमवर आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूवर टॅक्स सूट, नॉमिनी व्यक्तीला विमा रकमेचा आणि बोनसचा लाभ मिळतो.

पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर
जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी टर्म दरम्यान मृत्यू झाला असेल आणि त्याने मरेपर्यंत सर्व प्रीमियम भरले असतील, तर त्याच्या/तिच्या नॉमिनी व्यक्तीला डेथ बेनिफिट म्हणून डेथ सम एश्युअर्ड, सिंपल रिव्हर्सनरी बोनस आणि फायनल एडिशन बोनस (जर असेल तर) दिले जाईल. याचा अर्थ असा की, नॉमिनी व्यक्तीला अतिरिक्त विमा रक्कम मिळेल.

17 लाख कसे बनवले जातील ते सांगू
आपण एका उदाहरणाद्वारे समजावून घेउयात की, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 23 व्या वर्षी 16 वर्षांचा टर्म प्लॅन आणि 10 लाख विमा योजनेचा पर्याय निवडला तर त्याला 10 वर्षांसाठी दररोज 233 रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे त्याला एकूण 855107 रुपये भरावे लागतील. ही रक्कम मॅच्युरिटीवर दिली जाईल म्हणजे वयाच्या 39 व्या वर्षी, जी 17,13,000 रुपये असेल.