बारबालेचा नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरारमध्ये एका बारबालेने बनावट बंदुकीच्या आधारावर एक ज्वेलर्स दुकान लुटण्याचा (Theft) प्रयत्न केला. मात्र ज्वेलर्स मालकाच्या प्रसंगावधामुळे या महिलेचा डाव फसला आणि या सराफाने त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके ?
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी या ठिकाणी देवनारायण हे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्या दुकानात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या दुकानात खरेदीसाठी आली होती. त्यावेळी देवलाल गुजर हे दुकानात एकटे होते. दोन तास ती महिला लग्नासाठी दागिने बघत होती. यानंतर अचानक तिने लपवून आणलेली बंदूक काढली आणि देवलाल गुजर याला धमकावत दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी केली.

यावेळी ज्वेलरी शॉप मालक देवलाल गुजर यांनी प्रसंगावधान दाखवत या महिलेला पकडले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलेचा चोरीचा (Theft) फसलेला प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही महिला बारबाला असून मिरारोड येथील एका बारमध्ये काम करते. या प्रकरणी तिच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

 

Leave a Comment