Virat And Gambhir Interview : काय सांगता!! विराट-गंभीरची एकत्र मुलाखत; नुसती धमाल (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) … टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू.. मात्र जेव्हा जेव्हा दोघांचा विषय येतो तेव्हा तेव्हा आठवत ते फक्त त्यांच्यातील वाद आणि भाडणं.. भारतीय संघाकडून एकत्रित क्रिकेट खेळलेले हे दोन्ही महारथी आयपीएलमध्ये मात्र २ वेळा भर मैदानातच एकमेकांशी भांडताना संपूर्ण देशाने बघितलं आहे . त्यामुळे दोघांमध्ये नातं इतकं काही खास नाही असं बोललं जात होते. मात्र आता गंभीर हा टीम इंडियाचा मुख्य कोच बनलाय, तर कोहली अजूनही संघाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे दोघांच्याही नात्यात पुन्हा एकदा गोडवा आलाय. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने याबाबत थेट संकेत देत दोन्ही खेळाडूंचा एकत्रित मुलाखतीचा व्हिडिओ (Virat And Gambhir Interview) शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांची स्तुती आणि धमाल करताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओत? Virat And Gambhir Interview

तुम्ही या व्हिडिओत (Virat And Gambhir Interview) बघू शकता कि, कोहली आणि गंभीर खूप दिवसांनी असं मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत आणि एकमेकांचे कौतुक करत आहेत. गंभीरने आपल्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे क्षण आठवून संवादाला सुरुवात केली. तसेच ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले. या व्हिडिओत गंभीर म्हणतो, मला आठवते की तुझी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका किती आश्चर्यकारक होती. तू खूप धावा केल्या होत्या. त्या सीरिजने तुला झोनमध्ये आणले आणि माझ्यासाठी तोच झोन होता जेव्हा मी नेपियरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी केली होती. गंभीरने नेपियर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध १३७ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. यानंतर गंभीर पुढे म्हणाला की, त्यानंतर तो कधीही त्या झोनमध्ये येऊ शकला नाही. तो पुढे म्हणाला की त्या झोनमध्ये राहून काय वाटतं याची मी कल्पना करू शकतो. माझ्यापेक्षा जास्त वेळा तुम्ही तो झोन अनुभवला असेल.

त्यानंतर कोहलीने गंभीरला विचारले की जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता आणि तुमचा विरोधी पक्षांशी थोडासा संवाद असतो, तेव्हा तुम्हाला असे वाटते का की ते तुम्हाला त्या झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला आऊट करण्याचा तो एक प्लॅन असतो तेव्हा तुम्ही स्वतःला कसे प्रेरित करता . कोहलीच्या प्रश्नाला गंभीरने लगेच उत्तर दिले आणि या प्रश्नाचे उत्तर माझ्यापेक्षा तू चांगले देऊ शकतो, कारण माझ्यापेक्षा तू मैदानावरील वादांना अनेकदा सामोरे गेला आहेस. यानंतर दोघेही हसायला लागतात. त्यानंतर कोहली म्हणतो की,मी तर माझ्याशी कोणीतरी सहमत व्हावं हे शोधतोय. हे चुकीचं आहे असं सांगत नाही. कोणीतरी म्हणावं हो, असचं होतं”. विराट आणि गंभीरच हा विडिओ भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खूपच मजेशीर आहे.