विराट- अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? चर्चाना उधाण

virat and anushka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे क्रिकेट वर्ल्डकप कडे सर्वांचे लक्ष्य वेधलं असताना दुसरीकडे भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रेग्नेंट असून लवकरच दोघेही दुसऱ्यांदा पालक होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. यापूर्वी विराटला वामिकी नावाची एक मुलगी असून विराट आणि अनुष्काने अजूनही तिचा फोटो शोशल मीडियावर कधी शेअर केलेला आहे.

मुंबईतील एका मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर हे जोडपे कॅमेरामध्ये कैद झाले आणि विरुष्काच्या आयुष्यातील या नवीन बदलाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. परंतु अद्याप ह्या जोडप्याने अधिकृतपणे ही माहिती दिली नाहीये. अनुष्का ही नेहमी विराटसोबत दिसते. मग ती मॅच असेल किंवा एखादा टुरिस्ट स्पॉट असेल. अनेकदा भारताच्या सामन्यावेळी अनुष्का स्टेडियम मध्ये दिसली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती स्टेडियम मधेही दिसलेली नाही. त्यामुळे लावलेला हा अंदाज खरा असू शकतो अशी चर्चा सध्या सुरु आहे.

अनुष्का शर्मा सध्या तीन महिन्याची प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. विरुष्काने आपल्या पहिल्या मुलीची माहिती देखील गोपनीय ठेवली होती. ते अजूनही तिचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. त्यामुळे ह्यामध्ये कितपत खरं आहे हे अद्याप समोर आले नाहीये. विराट आणि अनुष्का जेव्हा मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींना भेटले त्यावेळी त्यांनी पापाराझींना फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याची विनंती केली होती. विरुष्का लवकरच नवीन पाहुण्याबाबत अधिकृत घोषणा करतील, असे आश्वासनही देण्यात आले.

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील प्रसिद्ध अशी जोडी आहे. २०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने अत्यंत थाटामाटात लग्न केलं होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांना वामिका नावाची मुलगी झाली. आता अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरु आहे.