संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं म्हणून राज्यात आपलं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आले अस विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले. संजय राऊतांच्या अंगात आलं ते बर झालं असेही ते म्हणाले. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली.

विश्वजित कदम म्हणाले, विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण असते होते. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आलं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन महिन्यानंतर संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचे सरकार बनले”

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने खोटी व निकष लावून फसवी कर्जमाफी केली. पण, महाविकास आघाडीमध्ये माझ्याकडे सहकार व कृषी खाते असल्याने निकषात बदल करून कर्जमाफी दिली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला. भाजपवाले फसवे आहेत; म्हणूनच तीन पक्षांनी एकत्रित येऊन सर्वसामान्यांसाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

You might also like