अवैध धंद्यांच्या हद्दपारीला तासगावातून सुरवात, नांगरे पाटील यांवे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तासगाव | राज्यात अवैध धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलिसांना सामान्य जनतेचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. राज्यातील अवैध धंदे हद्दपार करण्याची सुरुवात तासगाव तालुक्यातून करीत आहोत. तासगाव तालुका अवैध धंदेमुक्‍त करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची राहील, अशी घोषणा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे – पाटील यांनी केली. येथे लोकप्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर बैठकीस उपस्थित होते.

 इतर महत्वाचे –

नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

“कोणत्याही गावात मटकाबंदी, दारू बंदी अथवा सर्व अवैध धंदे बंद करायचे असतील तर त्यासाठी स्थानिक पंचांची गरज असते. बर्‍याच वेळा पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे न्यायालयात सिद्ध होत नाहीत. जर स्थानिक पंच असतील तर काळे धंदे बंद होण्यास मदत होईल. पोलिसांना मदत करा, चांगले पोलिसिंग होईल” असे नांगरे – पाटील यांनी सांगीतले. काही लोकप्रतिनिधींनी बिट हवालदार गावात नसतात, अशी तक्रार केली होती. त्यावर पाटील यांनी तासगाव उपविभागांतर्गत येणार्‍या सर्व पोलिस ठाणी व त्याअंतर्गत येणार्‍या सर्व बिट हवालदारांना बिटवर थांबून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत असे सांगीतले. ‘पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सलोखा राहील, असे काम पोलिसांनी करणे गरजेचे आहे’ असे पाटील म्हणाले.

‘सोशल मीडियावर जातीवाचक आणि भावना भडकतील अशा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जातील. असे काही गुन्हे तुम्हालाही आढळल्यास पोलिसांना त्याची माहिती द्या. तरुण पिढी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकते आहे. त्यांना वेळीच सावरले पाहिजे’ असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment