‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात विवेक ओबेरॉय दिसेल ‘या’ विविध रूपांत

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बायोपिक साकारण्यात आली आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील विवेकचा नवा लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

या चित्रपटात मोदींचे नऊ वेगवेगळे लुक्स आपल्याला दिसणार आहेत. संन्यासी, तरुण, मध्यमवयीन व्यक्ती अशा विविध रूपे आपल्याला पाहता येतील. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून विवेकचे नऊ वेगवेगळे लूक शेअर केले आहेत.

‘पीएम नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव असून, नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रित केला जाणार आहे. १२ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटात मोदींचे संपूर्ण आयुष्य दाखवले जाणार आहे. मोदींच्या जीवनातील ज्या गोष्टी लोकांना माहित नाहीत त्या या चित्रपटाद्वारे दाखविल्या जाणार आहेत.

या चित्रपटात अभिनेता मनोज जोशी हे अमित शाहंच्या भूमिकेत दिसती. अभिनेत्री बरखा सेन गुप्ता या मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसतील तर अभिनेत्री जरीना वहाब या त्यांच्या आईची भूमिका साकारणार आहेत. उमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. संदीप सिंह , सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
इतर महत्वाचे –

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

चंद्रपूर शहरातील असली किन्नारांना नकली किन्नरांकडून बेदम मारहाण

यशवंत चव्हाण यांचा वारसा चालविण्यासाठी नवीन पिढीची गरज आहे – शरद पवार