Vivo T3 5G या तारखेला भारतात लाँच होणार; काय काय फीचर्स मिळणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड विवो भारतीय बाजारात Vivo T3 5G हा नवा मोबाईल लाँच करणार आहे. मोबाईलच्या लॉन्चिंगची तारीखही समोर आली असून येत्या २१ मार्चला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पाहायला मिळेल. कंपनी या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या फोनची मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाईव्ह केली आहे, त्यामुळे मोबाईल मध्ये देण्यात आलेलया फीचर्सबाबत माहिती समोर आली आहे.

Vivo T3 5G या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशनसह येत असून 1800 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. कंपनीकडून या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7200 SoC चिपसेट वापरला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 8GB रॅम मध्ये तसेच 128GB आणि 256GB अशा 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा सँर्टफोन क्रिस्टल फ्लेक आणि कॉस्मिक ब्लू रंगांमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

कॅमेरा – Vivo T3 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 50MP Sony IMX 882 सेंसर आणि OIS सपोर्टसह मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2MP बुके लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात येईल आणि हि बॅटरी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Vivo T3 5G मोबाईलची किंमत अंदाजे १५ ते २० हजार रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येईल. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकांना हा मोबाईल परवडेल अशीच त्याची किंमत असेल.