Vivo V25 5G : 50MP सेल्फी कॅमेराचा दमदार मोबाईल लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Vivo V25 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल (Vivo V25 5G) कंपनी Vivo ने आज आपला Vivo V25 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला Vivo V23 Series सारखा अचूक रंग बदलणारा बॅक पॅनल पर्यायही मिळतो. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या मोबाईलची किंमत आणि यातील खास फीचर्स याबाबत….

6.44-इंचाचा डिस्प्ले- 

Vivo च्या या स्मार्टफोनला 6.44-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईल मध्ये Android 12 वर आधारित FunTouch OS 12 उपलब्ध आहे. तसेच कंपनी या स्मार्टफोनसोबत दोन वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देखील देणार आहे. याशिवाय या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसर, फास्ट चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Vivo V25 5G

50MP सेल्फी कॅमेरा – (Vivo V25 5G)

मोबाईलच्या कॅमेराबाबत (Vivo V25 5G) बोलायचं झाल्यास, विवोचा हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप सह येतो यामध्ये 64MP चा प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलला 50MP HD कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo V25 5G

 4500mAh बॅटरी- 

Vivo च्या या मोबाईलला 4500mAh बॅटरी मिळेल जी 44W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo V25 5G मध्ये 5G, 4G, GPS, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि Type-C पोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Vivo V25 5G

किंमत –

हा स्मार्टफोन (Vivo V25 5G) दोन स्टोरेज पर्यायसह येतो. एक म्हणजे – 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि दुसरं म्हणजे 12GB RAM + 256GB. यातील 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये आहे तर 12GB RAM + 256GB व्हेरिएन्टची किंमत 31,999 रुपये आहे. एलिगंट ब्लॅक आणि सर्फिंग ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा मोबाईल खरेदी केले जाऊ शकते. या मोबाइल मध्ये मागील पॅनल मध्ये रंग बदलणारा फ्लोराईट एजी ग्लास उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रकाश पडताच मोबाईलचा कलर बदलतो.