हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना रविवारी हार्ट अटॅक आला असल्याची माहिती टेलिग्राम चॅनलने दिली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांना तातडीने उपचार सेवा पुरवण्यात आली होती. यानंतर पुतीन यांना त्यांच्या निवासस्थानी असलेल्या ICU फॅसिलिटी मध्ये घेऊन जाण्यात आले. आता पुतीन यांच्या प्रकृतीत बरी सुधारणा झाली असून ते आपल्या निवासस्थानी उपचार घेत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, General SVR नावाच्या टेलिग्राम चॅनलवरुन पुतीन हार्ट अटॅक आल्याची माहिती देण्यात आली होती. हे चॅनल एका क्रेमलिनमधील माजी अधिकाऱ्याचे सांगण्यात येत आहे. General SVR दावा करण्यात आला आहे की, रविवारी व्लादिमीर पुतीन आपल्या खोलीमध्ये खाली कोसळलेले आढळले. यानंतर त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी माहिती दिली की, पुतीन यांनी हार्ट अटॅक आला आहे. ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती बिघडण्याची चर्चा सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पुतीन हे आजारी असल्याचे देखील म्हटले जात होते. ज्यामुळे त्यांचे लोकांसमोर येण्याचे प्रमाणही कमी झाले होते. या सर्व चर्चा सुरू असतानाच आता पुतीन यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे राजकिय वर्तुळात देखील खळबळ माजली आहे. मात्र अद्याप या विषयी कोणतीही अधीकृत माहिती देण्यात आलेली नाही