हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vladimir Putin : काही महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यानंतर जगभरातील अर्थकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. यानंतर रशियाचे अध्यक्ष असलेले व्लादिमीर पुतिन यांनी पहिल्यांदाच गुरुवारी ब्रिक्स देशांच्या परिषदेत भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी ब्रिक्स देशांशी व्यापारी संबंध वाढवण्यावर भर देणार असल्याचे सूतोवाच केले आहे. यादरम्यान त्यांनी भारतासोबतच्या व्यावसायिक संबंधांबाबतही मोठी चर्चा केली.
रशियामध्ये भारतीय सुपरमार्केट चेन उघडण्यासाठी रशिया आणि भारत यांच्यात चर्चा सुरू असल्याचे Vladimir Putin यांनी सांगितले. मात्र, रशियामध्ये कोणत्या भारतीय स्टोअर्सची चेन सुरू होईल हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रशियन बाजारपेठेत चिनी कार आणि उपकरणांचा हिस्सा वाढवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हंटले. हे लक्षात घ्या की, अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधं लादलेली असतानाही भारत आणि चीनने मोठ्या प्रमाणावर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
पुतिन पुढे म्हणाले कि…
Vladimir Putin म्हणाले पुढे की,” ब्रिक्स देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) बहुध्रुवीय जग निर्माण करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याची गरज आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.” यावेळी त्यांनी काही देशांवर “बेपर्वा आणि स्वार्थी पावले” उचलल्याचा आरोप देखील केला आणि यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हंटले. आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवत पुतीन म्हणाले की,” आर्थिक धोरणांमधील स्वतःच्या चुकांचे खापर संपूर्ण जगावर टाकून त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट निर्माण केले आहे. हा एक स्वार्थी प्रयत्न आहे ज्यावर प्रामाणिक आणि परस्पर सहकार्याने मात करता येईल.”
युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर लादले गेले निर्बंध
24 फेब्रुवारी रोजी रशियाकडून युक्रेनवर ‘विशेष लष्करी कारवाई’ अंतर्गत हल्ला चढावण्यात आला. यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले. मात्र, हे जाणून घ्या कि, अशातच भारत आणि चीनने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची खरेदी केली. Vladimir Putin
चीनने केले आहे आयोजन
या 14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे व्हर्च्युअल पद्धतीने चीन आयोजन करत आहे. BRICS ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची संघटना आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाले होते. त्यांच्या व्यतिरिक्त ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा हे देखील या परिषदेसाठी उपस्थित होते. Vladimir Putin
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/BRICS#:~:text=BRICS%20is%20the%20acronym%20coined,met%20annually%20at%20formal%20summits.
हे पण वाचा :
PAN-Aadhar Linking साठी आता फक्त 6 दिवसच बाकी, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया
PM Kisan च्या e-KYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया
Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदी तेजीत, नवीन दर तपासा
खुशखबर !!! Indusind Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ