हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स लाँच करत आहेत. Vodafone Idea ने देखील जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक प्लॅन्स सादर केले आहेत. यावेळी कंपनीकडून आपल्या काही प्लॅनबरोबर 75GB पर्यंत फ्री डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे जर आपल्याकडेही Vodafone Idea चे कार्ड असेल तर लवकरच याचा लाभ घ्या, कारण ही ऑफर आता लवकरच संपणार आहे.
हे लक्षात घ्या कि, Vodafone Idea कंपनीकडून काही प्रीपेड प्लॅनसोबत 75GB आणि फ्री डेटा प्लॅन अंतर्गत काही प्लॅनमध्ये 50GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लॅनच्या किंमती अनुक्रमे 1,449 रुपये, 2,899 रुपये आणि 3,099 रुपये आहेत. मात्र ही ऑफर फक्त 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरपर्यंतच व्हॅलिड असेल.
1,499 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये डेली 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 फ्री SMS बेनिफिट्स देखील दिले जातात. याव्यतिरिक्त या प्लॅन अंतर्गत 50GB अतिरिक्त डेटा देखील मिळत आहे. मात्र ही ऑफर फक्त 14 सप्टेंबरपर्यंत व्हॅलिड असेल. म्हणजेच 50 जीबी फ्री डेटा मिळवायचा असेल तर 14 सप्टेंबरपूर्वी रिचार्ज करावे लागेल.
2,899 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या या 2,899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये डेली 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 फ्री SMS मिळत आहे. याशिवाय कंपनीकडून यामध्ये 75GB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे.
3,099 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या या 3,099 रुपयांच्या प्लॅनमध्ये जो 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये डेली 2 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 फ्री SMS मिळत आहे. इतकेच नाही तर या प्लॅन अंतर्गत कंपनी Disney+Hotstar Mobile चे 1 वर्षापर्यंतचे सबस्क्रिप्शन देखील देत आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये कंपनी कडून 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/prepaid/best-prepaid-plans
हे पण वाचा :
Credit Card वर EMI करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात घ्या !!!
Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा !!!
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस !!!
Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या
Investment : ‘या’ सरकारी बचत योजना देत आहेत FD पेक्षा जास्त व्याज, त्याविषयी जाणून घ्या