हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vodafone Idea : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत,आज आपण Vodafone Idea कडून ग्राहकांसाठी दिल्या जाणाऱ्या रिचार्ज प्लॅन बाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
हे लक्षात घ्या कि, Vodafone Idea कडून ग्राहकांसाठी दोन वार्षिक प्लॅन ऑफर केले जातात, ज्यांची किंमत 2899 रुपये आणि 3099 रुपये इतकी आहे. चला तर मग या दोन्ही प्लॅनमधील फरक आणि त्यांच्या फायद्यांबाबतची माहिती जाणून घेउयात…
2899 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबतच डेली 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही देण्यात आले आहे. तसेच यामध्ये ग्राहकांना मर्यादित काळासाठी 75GB बोनस डेटा देखील दिला जात आहे. यासोबतच यामध्ये Vi Hero Unlimited बेनिफिट्स, Vi Movies आणि TV VIP चा ऍक्सेस मिळेल.
3099 रुपयांचा प्लॅन
जास्त व्हॅलिडिटी हव्या असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसोबत 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच डेली 2GB डेटा आणि डेली 100 SMS देखील मिळतील.
या प्लॅनमधील अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना Vi Hero अनलिमिटेड बेनिफिट्स, Vi Movies आणि TV VIP, एक वर्षासाठी Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय यामध्ये मर्यादित कालावधीसाठी 75GB बोनस डेटा देखील दिला जात आहे.
कोणता प्लॅन चांगला ठरेल ???
या दोन्ही प्लॅनच्या फरकाबाबत बोलायचे झाल्यास, Vodafone Idea च्या2899 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 1.5 जीबी डेटा तर 3099 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2 जीबी डेटा मिळेल. त्यामुळे, जर आपल्याला कमी डेटा चालत असेल तर 2899 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करता येईल. याशिवाय आणखी एक फरक म्हणजे 3099 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney + Hotstar चा लाभही दिला जातो.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/prepaid/best-prepaid-plans
हे पण वाचा :
5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!
Multibagger Stock : 1 वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल
FD Rates : ‘या’ 4 बँकांच्या FD वर मिळते आहे 7% पेक्षा जास्त व्याज
गेल्या 20 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!