Wednesday, February 8, 2023

पानटपरीवर धक्का लागल्याने आरोपी तरुणांनी केला ‘हा’ कांड

- Advertisement -

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमधील कामोठे परिसरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 17 वर्षीय तरुणाची चाकू भोकसून हत्या (Murder) करण्यात आली आहे. विशाल मौर्या असे या घटनेतील मृत (Murder) व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत विशाल हा नेहमीप्रमाणे बेकरीचे काम संपवून रात्री 11 च्या सुमारास जवळच असलेल्या एका पान टपरीवर पान खाण्यासाठी आला. त्याचवेळी आरोपी रवींद्र हरियानी आणि राज वाल्मिकी हे दोघे पान खात होते. त्याचवेळी या दोघांना विशालचा चुकून धक्का लागला. यानंतर आरोपींनी विशालला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान पानवाल्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

- Advertisement -

यादरम्यान आरोपी राज याने आपल्या जवळ असलेल्या चाकूने विशाल याच्या पाठीत वार (Murder) केला आणि तिकडून पळून गेले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत (Murder) घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. धक्का लागण्याचे कारणातून ही घटना घडली की यामागे अजून काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!