Vodafone Idea चे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरत गेल्या 52-आठवड्याच्या नीचांकावर पोहोचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea -VIL) चे शेअर्स मंगळवारी BSE वर इंट्राडेमध्ये गेल्या 52 आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले. कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरून 7.26 रुपयांवर आले. या घसरणीवर, कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला यांनी सरकारला सांगितले आहे की,” ते आपला हिस्सा सोडण्यास तयार आहेत.”

यापूर्वी, कंपनीच्या शेअर्सने गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी 7.60 रुपयांची पातळी गाठली होती. जुलै 2020 नंतर ते सर्वात कमी पातळीवर ट्रेड करत होते. नोव्हेंबर 2019 मध्ये हा स्टॉक 2.61 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. दुपारी 2:15 वाजता ते 9.70 टक्क्यांनी घसरून 7.45 रुपयांवर ट्रेड करत होते.

शेअर्स 7.40 रुपयांवर बंद झाले
NSE वर कंपनीचे शेअर्स 10.30 टक्क्यांनी किंवा 0.85 अंकांनी घसरून 7.40 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स मे 2020 च्या पातळीवर पोहोचले आहेत. AGR मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीचे शेअर्स सतत घसरत आहे. AGR थकबाकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला कोणताही दिलासा दिला नाही.

या निर्णयानंतर कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला यांनी सरकारला पत्र लिहिले. त्यांनी सरकारला कंपनीतील भाग खरेदी करण्याची विनंती केली. यानंतर कंपनीचे शेअर्स सतत घसरत आहेत. कंपनीवर सुमारे 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला
आज बाजार मंगळवारी एका नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी तेजी आली आणि ट्रेडिंग संपल्यावर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद होण्यात यशस्वी झाला. एकीकडे, जिथे निफ्टीने डबल शतक ठोकले. तर दुसरीकडे, सेन्सेक्स 53,800 च्या पुढे बंद करण्यात यशस्वी झाला. निफ्टीने 21 मे नंतर आज म्हणजे 3 जुलै रोजी सर्वात मोठी रॅली पाहिली आणि ते पहिल्यांदाच 16000 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाले.

बँकिंग, FMCG, ऑटो शेअर्समध्येही आजच्या व्यवसायात मोठी वाढ दिसून आली
ट्रेडिंग संपल्यावर सेन्सेक्स 872.73 अंकांनी किंवा 1.65 टक्क्यांच्या वाढीसह 53,823.36 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 245.60 अंक किंवा 1.55 टक्क्यांच्या वाढीसह 16,130.75 वर बंद झाला.

Leave a Comment