Vodafone Idea: VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत ​​आहे जबरदस्त ऑफर्स

Vodafone Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vodafone Idea : मोबईल फोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. अशातच टेलिकॉम कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन ऑफर्स लाँच करत आहेत. आता प्रश्न येतो तो मोबाईल नंबरचा. यासाठी प्रत्येक कंपनी ग्राहकांना एक विशिष्ट नंबर देत असते. मात्र प्रत्येकाला आपला मोबाईल नंबर हटके असावा असे वाटत असते. यामुळे VIP किंवा फॅन्सी नंबरची क्रेझही खूप वाढतच आहे. यासाठी लोकांकडून भरपूर पैसे देखील खर्च केले जातात. मात्र, आता आपल्याला यासाठी जास्त खटाटोप करण्याची काहीच गरज नाही. कारण एका टेलिकॉम कंपनीकडून VIP किंवा फॅन्सी नंबर फ्री मध्ये दिला जात आहे.

Mobile technology | IBM

हे लक्षात घ्या कि, VIP नंबर्समध्ये काही खास नंबर्सचे कॉम्बिनेशन असते. यामध्ये एखाद्याची जन्मतारीख किंवा लकी नंबर देखील असतो. यामुळे जर आपल्यालाही फॅन्सी नंबर फ्रीमध्ये मिळवायचा असेल तर ही बातमी पूर्ण वाचा…

होय… Vodafone Idea (Vi) या टेलिकॉम कंपनी कडून आपल्या ग्राहकांना फ्रीमध्ये फॅन्सी नंबर दिला जात आहे. मात्र यासाठी ग्राहकांना फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तसेच यामध्ये आपल्याला फॅन्सी नंबर दुसर्‍या टेलिकॉम ऑपरेटरकडे पोर्ट करण्याची सुविधा देखील मिळेल.

Téléphonie mobile : bien choisir son portable | economie.gouv.fr

हे लक्षात घ्या कि, Vodafone Idea कडून आपल्या ग्राहकांना पोस्टपेड आणि प्रीपेडचे फॅन्सी नंबर फ्री मध्ये घेण्याची सुविधा दिली जात आहे. जे मिळवण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर मेनूमधून नवीन कनेक्शनच्या विभागात जावे लागेल.

इथे फॅन्सी नंबर कॅटेगिरी दिसेल. ज्यामध्ये प्रीपेड किंवा पोस्टपेड कनेक्शनसाठी विचारले जाईल. म्हणजेच, आपल्याला प्रीपेड की पोस्टपेड कनेक्शन हवे आहे हे निवडता येईल. यानंतर पिन कोडसोबत मोबाईल नंबर द्यावा लागेल.

Le téléphone portable en occitan

यानंतर फॅन्सी नंबर निवडता येईल. जर आपल्याला एखादा विशिष्ट नंबर आवडत असेल तर त्यातील तीन ते चार अंक टाकूनही तो नंबर शोधता येईल. त्यानंतर समोर दाखविलेल्या पर्यायामधून आपल्या आवडीचा नंबर निवडा.

यानंतर दिलेल्या पर्यायामधून एक प्लॅन निवडावा लागेल. हा प्लॅन निवडल्यानंतर पेमेंट करा. आपले पेमेंट पूर्ण झाल्यानंतर फॅन्सी नंबर घरपोच डिलिव्हर केला जाईल. त्यानंतर हा नंबर ऍक्टिव्हेट करून इतरांसह शेअर करता येईल. Vodafone Idea

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/blog/vip-numbers-for-sale

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर