हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Voter ID : देशातील नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारकडून वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेमध्ये म्हंटले कि,” आता ही सुविधा पुढील वर्षापर्यंत कायम राहणार असून, जर कार्डधारकाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक केले नाही तर त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
सरकारने अधिसूचना जारी करत म्हटले की, आतापर्यंत मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2023 होती, जी आता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता कार्डधारकांना हे काम पूर्ण करण्यासाठी 1 पूर्ण वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळेल. आधार आणि मतदार ओळखपत्र (Voter ID) लिंक करण्याचे काम पूर्णपणे ऐच्छिक असून ते बंधनकारक करण्यात आलेले नाही, असेही यावेळी सरकारने म्हटले आहे. तसेच जर कोणी असे केले नाही तर त्याच्यावर कोणतीही कारवाई देखील केली जाणार नाही. मात्र, त्याच वेळी निवडणूक आयोगाकडून हे दोन्ही कार्ड लिंक करण्याचे अनेक फायदे देखील सांगण्यात आले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की,”यामुळे योग्य मतदाराची ओळख पटवणे आणि कोणत्याही मतदारसंघात एकाच नावाने दोन नोंदणी होण्यासारख्या गोष्टी टाळता येतील.”
कॉल आणि एसएमएसद्वारे अशा प्रकारे करा लिंक
हे लक्षात घ्या कि, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करता येतील. आपल्याला मोबाइलवरून मेसेज पाठवून किंवा कॉल करूनही लिंकिंग करता येईल. एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी आपले आधार आणि मतदार ओळखपत्र क्रमांक 166 किंवा 51969 वर एसएमएस करा. यासाठी ECILINK<SPACE><EPIC No.><SPACE><Aadhaar No.> या फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवावा लागेल. तसेच सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1950 क्रमांकावर कॉल करून आपला मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक सांगून लिंक करता येईल.
अशा प्रकारे ऑफलाइन करा लिंक
ऑफलाइन मोडद्वारे आधार आणि Voter ID लिंक करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसरकडे (BLO) अर्ज करावा लागेल. BLO त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर दोन्ही कागदपत्रांची लिंक रेकॉर्डमध्ये दिसू लागेल. यानंतर NVSP वेबसाइटवर EPIC टाकून BLO बाबतची माहिती मिळवता येईल.
ऑनलाइन लिंक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट http://nvsp.in वर जा.
लॉगिन करून होम पेजवर Search in Electoral Roll पर्याय शोधा.
पर्सनल डिटेल आणि आधार क्रमांक एंटर करा.
रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
OTP टाकताच आधार कार्ड आणि Voter ID लिंक केले जाईल.
हे पण वाचा :
Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर
Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर