Voter ID registration : मतदान ओळखपत्र काढण्यासाठी कसा अर्ज करावा? कागदपत्रे काय लागतात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Voter ID registration : भारतात सध्या लोकसभा निवडणुकांचे वार वाहू लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या म्हणजेच १६ मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल. देशात एकूण ७ टप्प्यांत लोकसभा निवडणूका होण्याचा अंदाज असून कोणकोणत्या तारखेला कुठे मतदान असेल ते उद्याच स्पष्ट होईल. भारतासारख्या लोकशाही जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या देशात मतदान करणे हे नागरिकांचे सर्वात मोठं कर्त्यव्य आहे. भारतात १८ वर्ष पूर्ण झालेला कोणताही नागरिक मतदान करण्यास पात्र ठरतो.

मतदान करण्यासाठी नागरिकांकडे वैध मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र प्राथमिक ओळख दस्तऐवज म्हणून काम करेल. तुम्ही नुकतेच १८ वर्ष वय पूर्ण केलं असेल आणि नवीन मतदानकार्ड (Voter ID registration)तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म 6 भरणे आवश्यक आहे. तर तुमचा पत्ता किंवा निवासस्थान स्थलांतरित करण्यासाठी/सध्याच्या कार्डमधील नोंदी दुरुस्त करण्यासाठी, फॉर्म 8 भरणे आवश्यक आहे.

कोणकोणती कादगपत्रे लागतात – Voter ID registration

ओळखीचा पुरावा,
पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी दाखला
जन्मतारीख पुरावा

नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा करावा

सर्वात आधी voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
‘सामान्य मतदारांसाठी नवीन नोंदणी’ वर, फॉर्म 6 भरा वर क्लिक करा.
आता लॉगिन करा.
खाते तयार झाल्यानंतर, फॉर्म 6 भरा आणि सर्व आवश्यक डिटेल्स सह कागदपत्रे आणि फोटो लावा .
तुम्ही भरलेले सर्व तपशील तपासा आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटन वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्ही ‘रेफरन्स क्रमांक आणि राज्याचे नाव वापरून वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.