साताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा कमीच; घटलेल्या मतदानाचा अर्थ काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ४ वाजेपर्यंत ४८.४५ टक्के मतदान झाल्याचं पहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील सातारा-जावली,कोरेगाव,खंडाळा,कराड उत्तर,कराड दक्षिण, फलटण, माण-खटाव आणि पाटण या ८ मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानातून ही सरासरी काढण्यात आली आहे. आजच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होती. मतदार पुनर्रचनेत फलटण आणि माण-खटाव हे दोन मतदारसंघ माढा लोकसभेत गेल्याने उर्वरित ६ मतदारसंघातील नागरिकांनी लोकसभेच्या जागेसाठीही मतदान केलं.

सातारा जिल्ह्यातील २५ लाख २२ हजार २८९ मतदारांपैकी १२ लाख २१ हजार ९२९ मतदारांनी ४ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख ३२ हजार २८९ पुरुषांनी, ५ लाख ८९ हजार ५३१ महिलांनी आणि ९ तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवला. माण-खटाव आणि फलटणमध्ये नागरिकांचा अनुत्साह पहायला मिळाला. येथे सरासरी ४५.३६ टक्के मतदान झाले होते. उर्वरित ६ गटांत सरासरी ४९.५७% मतदान झालं आहे. घटलेल्या मतदानाचा फायदा-तोटा कुणाला होणार याकडेच आता सातारकर नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment