भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा प्रतिनिधी । आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान मतदानाला सुरवात झाल्यानंतर मोठ्या उत्स्साहात नागरिकांकडून मतदान करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या मतदान यातील आपले नाव शोधून, मग त्या मतदान यादीतील नम्बरची चिठ्ठी घेऊन नागरिक मतदान केंद्राच्या आत मध्ये जात असलेलं पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भाग असल्याने अगदी सकाळी जरी गर्दी कमी असली तरी काही वेळानंतर नागरिकांची अवाक वाढणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.

Leave a Comment