सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील मतदार संघातील रुग्णांसाठी 400 पेक्षा जास्त नॉन ऑक्सिजन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तसेच वाई मॅप्रो कोव्हिड रुग्णालयात 50 ऑक्सिजन व 8 व्हेंटिलेटर बेड आहेत. आज सुरवातीला येथे 36 रुग्णांना उपचार सुरु होणार आहेत. नंतर यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी सांगितले.
वाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून शेंदुरजणे, वाई येथील मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे लोकार्पण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ सुभाष चव्हाण,प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर,पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे,तहसीलदार रणजित भोसले,गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर,आरोग्य अधिकारी डॉ संदीप चव्हाण,नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे,उपनगराध्यक्ष अनिल सावंत,मुख्याधिकारी विद्या पोळ आदी उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, आणखी 25 ऑक्सिजन बेडचे काम सुरु केले आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील १५ दिवस रात्र आ. मकरंद आबा दिवस रात्र तळ ठोकून होते. सर्व प्रशासनला सोबत घेऊन हे कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळाले. या कामी मॅप्रो, गरवारे टेक्निकल फाइबर लिमिटेड, वाई नगरपालिका व मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, वाई मिशन हॉस्पिटल आदींचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba