सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील वाई येथे फ्लॅट खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेतले. मात्र, बँकेची परवानगी न घेताच दुसऱ्या व्यक्तीस विक्री करून तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, सातार जिल्ह्यातील वाई येथील गणेश दत्तात्रय सावंत (रा. जगताप हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर, वाई) याने 17 ऑक्टोबर 2018 रोजी आयडीबीआय बँकेच्या कडून वीस लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्याच्याकडून बँकेचे हप्ते भरण्याचे काम केले गेले. मात्र, हप्ते थकल्यानंतर बँकेची परवानगी न घेता त्याने बँकेकडून कर्ज घेऊन खरेदी केलेला प्लॅट परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकला.
या प्रकरणाबाबत माहिती मिळाल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक अतुल अशोक संकपाळ यांनी वाई पोलीस ठाण्यात जाऊन गणेश सावंत याच्या विरोधात फिरण्यात दाखल केली. संकपाळ यांच्या फिर्यादीनंतरवाई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.