व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रिअल लाइफ ‘रॅन्चो’ने सुचवला चीनला हरवण्याचा ‘हा’ मार्ग

लडाख । सध्या लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे. चीन वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करत असून सीमेलगतच्या भारताच्या रस्ते उभारणीला तो विरोध करत आहे. अशातच भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतरच भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मुळचे लडाखभागातील मॅगसेसे पुरस्कार विजेता सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनला गुढघे टेकवण्याचा एक महत्वाचा मार्ग सांगितला आहे. यूट्यूबवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भारत-चीनच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे. चीनच्या सामानांवर बहिष्कार करण्याचं आवाहन त्यांनी या व्हिडिओतून केलं आहे.

सोनम वांगचुक ही तिच व्यक्ती आहे ज्यांच्या जीवनावर आमीर खानने ‘थ्री इडियट’ हा सिनेमा तयार केला आहे. ज्यात त्यांचं नाव रॅन्चो असं ठेवलं होत. वांगचुक यांनी आपल्या या व्हिडिओत सांगितलं आहे की,’एका आठवड्यात तुम्ही चीनचे सगळे सॉफ्टवेअर काढून टाकण्याचे त्यांनी सुचवले आहे. इतकेच नव्हे तर एका आठवड्यात ते स्वतः आपला चायना मेड फोन वापरण बंद करणार आहे. या वक्तव्यामागचं कारण देखील सोनम वांगचूक यांनी सांगितलं. भारतीय सैन्य चीनला बुलेटने उत्तर देईल तर एक नागरिक म्हणून आपण त्यांना वॉलेटने उत्तर देण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले.

एका बाजूला आपले सैनिक त्यांच्याशी लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपली चीनी हार्डवेअर विकत घेतो. टिकटॉक सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतो. यातून आपण त्यांना करोडो रुपयांचा बिझनेस देतो. ५३ वर्षीय सोनम विचारतात की,’भारत-चीन सीमा तणावाच्या यावेळी एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे असं वांगचुक यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”