मुंबई प्रतिनिधी । वरळी मतदारसंघाच्या निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्याचवेळी बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. बिचुकले यांना किती मतं मिळतील याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मजमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीअखेर मतांचा भोपळाही न फोडणाऱ्या बिचुकले यांना दुसऱ्या फेरीअखेर मात्र १५० अधिक मते मिळाली आहेत.
दरम्यान, वरळी मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे यांना विजयी आघाडी मिळाली आहे. निकालाच्या पहिले कल येण्यास सुरुवात झाली, तेव्हापासूनच आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. ती आतापर्यंतच कायम आहे.