हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौकेसह आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना, मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “भारताचा समुद्री वारसा, नौदलाचा गौरवशीला इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य, दूरदृष्टी दिलेली आहे. आज त्यांच्या या पावन भूमीवर 21 व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठ पाऊल उचलत आहोत”
त्याचबरोबर, “हे पहिल्यांदा होतय, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन तिघांना एकत्र कमिशन केल जातय. सर्वात गर्वाची बाब म्हणजे हे तिन्ही फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म मेड इन इंडिया आहेत” असेही त्यांनी म्हणले. यासह, “मी भारतीय नौदलाला, निर्माणकार्याशी संबंधित सर्वांना, इंजिनिअर्सना, श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाइम पावर बनत आहे.” असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, आयएनएस सूरत ही युद्धनौका देशाच्या प्राचीन सामुद्रिक व्यापाराची आठवण करून देते, तर आयएनएस नीलगिरी ही चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे. आयएनएस वाघशीर ही देशातील सहाव्या पाणबुडी प्रकल्पाचा भाग असून, ती भारताच्या संरक्षण यंत्रणेची ताकद वाढवेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.