हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात टी 20 सामन्यांची (IND vs SL 3rd T20) सीरीज सुरु आहे. या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकले आहेत. त्यामुळे या सिरीजचा (IND vs SL 3rd T20) शेवटचा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आणि निर्णायक असणार आहे. दोन्ही टीम्समध्ये 7 जानेवारीला सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हा सामना (IND vs SL 3rd T20) खेळवण्यात येणार आहे. या मॅचसाठी कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग 11 मध्ये बदल करु शकतो. या सामन्यात हार्दिक पांड्या एका घातक खेळाडूला संघात स्थान देऊ शकतो. चला मग जाणून घेऊया या खेळाडूबद्दल…
या खेळाडूचे नाव आहे वॉशिंग्टन सुंदर. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) अखेरच्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग बनू शकतो. वॉशिंग्टन सुंदर किफायती गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान देतो. कॅप्टन पंड्यासाठी वॉशिंग्टन सुंदर मॅचविनर ठरु शकतो. वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला. त्याने या सामन्यातून (IND vs SL 3rd T20) आपल्या खेळाची झलक दाखवली आहे. वॉशिंग्टन सुंदर आपला शेवटचा टी 20 सामना पंड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर खेळला होता.
टी20 सीरीजसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या, (कॅप्टन) सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट