Wednesday, June 7, 2023

अतिरिक्त बोट ऋतिक रोशनकडं आहे, पण काड्या नेहमी मायकल वॉन करतो ; जाफरचे प्रत्यतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार मायकल वॉन नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अनेक विधान करून तो सर्वांचं लक्ष्य आपल्याकडे वळवतो. नुकतंच त्याने विराट कोहली आणि न्युझीलंड चा केन विल्यमसन यांची तुलना करताना टोला लगावला होता.

वॉननं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याच्या सोबत तुलना करत विराटवर निशाणा साधला आहे. वॉन म्हणाला होता कि, ‘विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला असता, पण विराट कोहली असेपर्यंत तो कधीही सर्वोत्तम खेळाडू ठरणार नाही, कारण तो भारतीय नाही,’ असं म्हणत त्याने कोहलीवर निशाणा साधला होता.

त्यावर वॉनला वसिम जाफरने जबरदस्त प्रतिउत्तर दिल आहे. वासीम ट्विट करत म्हणाला, ‘ऋतिक रोशनकडं अतिरिक्त बोट आहे,.पण मग का मायकल वॉन करतो.’ या शब्दात जाफरनं वॉनला उत्तर दिलंय. जाफरचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.