हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shahid Kapoor) आजच्या डिजिटल युगात जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ, गाणी डायलॉग, रिल्स याबद्दल सगळ्यांनाच माहीत असतं. अनेकदा सोशल मीडियावर व्हायला होणारे व्हिडिओ हे डोकं फिरवणारे असतात. तर कधी कधी पोट धरून हसवणारेसुद्धा असतात. असाच एका अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये हा अभिनेता आपल्या नातेवाईकांच्या एका ठरलेल्या प्रश्नाचा अलग अंदाज सादर करताना दिसतोय. चला तर आपणही पाहूयात हा भन्नाट व्हिडिओ.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ बॉलीवूड सिनेमा इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर याचा आहे. या व्हिडिओत शाहिद कपूरचा आजपर्यंत कधीही न पाहिलेला एक वेगळाच अंदाज त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतोय. डोक्यावर ओढणी, हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर कमालीचे एक्सप्रेशन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) काही दिवसांपूर्वीच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ अजूनही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.
या व्हिडिओमध्ये शाहिद कपूरने एखाद्या सोहळ्यात, लग्नात किंवा कोणत्याही एखाद्या ठिकाणी खूप दिवसांनी नातेवाईक भेटल्यानंतर कसे रिऍक्ट करतात याचा एक नजराणा पेश केलाय. मात्र या व्हिडिओतील त्याचा अंदाज हा प्रचंड कॉमिक असल्यामुळे पोट धरून काय तर पोट दुखेपर्यंत हसायला येतंय. (Shahid Kapoor) या व्हिडिओसोबत शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मला आवडणाऱ्या नातेवाईकांचा प्रकार’. या व्हिडिओत त्याने ‘तू किती जाड झाला आहेस’ असे म्हणून चित्र विचित्र चेहरे करणाऱ्या नातेवाईकांचा प्रकार दाखवला आहे.
शाहिदचा व्हिडीओ अतिशय भन्नाट आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘कसला भारी आहेस तू… मला आठवत पण नाहीये मी हा व्हिडीओ कितीवेळा पाहिलंय.. खूपच कमाल आहे’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘हो यार… माझेपण नातेवाईक असेच आहेत.. जेव्हा भेटतात तेव्हा बोलतात, तू मोटा किन्ना हो गया है।’.