हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना चहा (Tea) पिणं कमी करण्याचं अजब आवाहन केले आहे. यामागचं कारण ऐकून तुम्हालासुद्धा हसू आल्याशिवाय राहणार नाही. सध्या पाकिस्तान सरकार आर्थिक डबघाईला आल्याने चहा (Tea) आयातीसाठी लागणारं शुल्क कमी होण्यास त्यामुळे मदत होईल, असे कारण या मंत्र्याने नागरिकांना दिले आहे. पाकिस्तानचे केंद्रीय नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांनी देशवासियांना चहा (Tea) कमी करण्याचं आवाहन केलं आहे.
“चहा कमी प्या”; पाकिस्तानच्या मंत्र्यांचे नागरिकांना अजब आवाहन pic.twitter.com/nTgiUUnnaI
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 17, 2022
2021-22 या आर्थिक वर्षात तब्बल 83.88 अब्ज रुपये (40 कोटी डॉलर) किंमतीच्या चहाचं (Tea) सेवन पाकिस्तानमध्ये केले गेले होते. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर नियोजनमंत्र्यांनी नागरिकांना “चहा कमी प्या” हे अजब आवाहन केले आहे. “जगातील सर्वाधिक चहा (Tea) आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. हा चहा आयात करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे मी देशवासियांना असे आवाहन करतो की दिवसातून एक-दोन कप चहा (Tea) कमी प्या. कारण आपल्याला कर्ज करून चहा आयात करावा लागत आहे. त्यांच्या या अजब आवहानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ऊर्जा बचतीसाठी आपण व्यापाऱ्यांनाही बाजारपेठ रात्री साडेआठला बंद करण्याचं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. “त्यामुळे इंधन आयातीसाठी शुल्क कमी करण्यास हातभार लागेल. जर कठोर निर्णय घेऊन ते अमलात आणले नाही, तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अवस्था श्रीलंकेप्रमाणेच दयनीय होईल”, असा इशारा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. एहसान इक्बाल यांनी केलेल्या या अजब आवहानाची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली आहे.
हे पण वाचा :
राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते; सदावर्तेचा पवारांना टोला
Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ जाहीर ! नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्व
राजनाथ सिंहांचा उद्धव ठाकरेंना फोन; लवकरच भेट होण्याची शक्यता
नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण
‘आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’