हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्या येथील श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत या दृष्टीने बांधकाम, सुशोभीकरणावेग आला आहे. दि. 22 जानेवारीला श्री रामांच्या मुर्तीची प्राण – प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जगातील 156 देशांचे सहकार्य लाभत आहे. हे सहकार्य कोणत्या गोष्टीत आहे, ते आपण पाहणार आहोत. अयोध्यानगरीत हजारो वर्षांनी श्री रामांचे मंदिर होत आहे. या मंदिराची प्रतीक्षा भारतातील करोडो लोकांना आहे. रामलल्लाची मूर्ती 17 जानेवारीला मंदिरात बसवली जाणार आहे. अयोध्यानगरीत या दिवशी थाटामाटात मिरवणूक काढून रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. आता श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेची म्हणजे 22 जानेवारी 2024 च्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. यावेळी श्री रामांच्या अभिषेकासाठी एक खास गोष्ट लागणार आहे, ती अनेक देशांतून भारतात पाठविली आहे. त्या गोष्टीचा श्री रामांच्या अभिषेकासाठी वापर होणार आहे.
जगभरातील पाणी भारतात
एप्रिल 2023 मध्ये दिल्लीतील भाजपचे माजी आमदार विजय जॉली यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी विजय जॉली यांनी गडकरींना, 155 देशांमधून आणलेल्या पवित्र पाण्याच्या एका कलशाबाबत माहिती दिली होती. या कलशांवर जगातील अनेक देशांच्या नावाचे स्टिकर्स आहेत. या कलशातील जल ऐतिहासिक असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 17 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम लल्लाच्या अभिषेकानिमित्त मुघल शासक बाबरचे जन्मस्थान उझबेकिस्तानमधूनही रामलल्लाच्या अभिषेकासाठी पाणी आणण्यात आले आहे. पाकिस्तान, चीन, दुबई तसेच अंटार्क्टिकाच्या पाण्यातून श्री रामाचा अभिषेक केला जाणार आहे.
विविध देशांतून पाणी संकलन
भाजपाचे माजी आमदार विजय जौली यांनी, जवळपास 156 देशांचे पाणी संकलन केल्याचा दावा केला आहे. यात जगभरातील सर्व धर्माच्या लोकांनी सहकार्य केले आहे. सौदी अरेबियातून हिंदू, इराणमधून मुस्लीम महिलांनी श्री रामांच्या अभिषेकासाठी पाणी भारतात पाठवून दिले आहे. कझाकस्तानमधून ताज मोहम्मदने तेथील मुख्य नदीचे पाणी पाठवून दिले आहे. केनियातून शीख बांधवांनी तेथील पाणी गोळा करुन भारतात पाठवले आहे. सिंधी लोकांनी पाकिस्तानामधून अयोध्येला पाणी पाठवले आहे. अशाप्रकारे जगातील 156 देशांतील पाण्यांचे संकलन केले गेले आहे. भाजपाचे माजी आमदार विजय जौली यांनी याबाबत म्हटले आहे की, पाणी असलेला एक कलश नुकताच विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक मंडळ सदस्य दिनेश चंद्र यांच्याकडे दिला गेला आहे. 17 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सदर पाण्याचा वापर केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी आमदार विजय जौली यांनी दिली आहे.