औरंगाबाद – अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने काल सकाळपासून जायकवाडी धरणात 57 हजार 457 क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे. 12 तासात धरणाचा जलसाठा 75 टक्के अशी भरघोस वाढ झाली असून, गेल्या 24 तासात नाशिक व नगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरण समूहातून होणारे विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता घटविण्यात आले आहे अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विसर्गामुळे गोदावरी 40 हजार क्युसेक क्षमतेने वाहत असून, नगर जिल्ह्यातील धरण समाजातून झालेल्या विसर्गामुळे प्रवरा नदी देखील 27 हजार 100 कशी वेगाने वाहत आहे. अहमदनगर चे पाणी काल सकाळी नऊ वाजता जायकवाडी धरणात येऊन धडकले. यामुळे दोन्ही नद्यांचे मिळून जायकवाडी धरणात 57 हजार 457 अशा मोठ्या क्षमतेने आवक झाली. दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने नगर जिल्ह्यातील धरणातून होणारा विसर्ग घटून नाममात्र करण्यात आले. तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग ही काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातील भंडारदरा 1 हजार 425, निळवंडे 685, वझर वेअर मधून 1 हजार 93 क्युसेक इतका नाम मात्र विसर्ग प्रवरा नदीत करण्यात येत आहे.
प्रवरा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील विसर्ग बुधवारी घटविण्यात आले असून धारणा 2 हजार 672 क्युसेक, कडवा 1 हजार 272 क्युसेक, आळंदी 80 क्युसेक, वालदेवी 599 क्युसेक, गंगापूर 553 क्युसेक व नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 8 हजार 40 क्युसेक विसर्ग सुरू आहेत. विसर्ग ठेवण्यात आल्याने गोदावरीचे पाणी पातळी काही प्रमाणात कमी होणार आहे. आज सकाळी धरणात उपयुक्त जलसाठा 68.38 टक्के इतका झाला आहे. तर मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात उपयुक्त जलसाठा 98.62 टक्के इतका होता. सध्या धरणात जलसाठा 2 हजार 182.44 त्याला दलघमी तर उपयुक्त जलसाठा 1 हजार 444.444 इतका झाला आहे.