स्वातंत्र्य मिळूनही सुटेना गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न; कराड तालुक्यातील 6 वाड्यांत पाण्याची आणीबाणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. हक्काचं पाणी पैसे देऊन विकत घ्यावं लागत आहे. पाण्याअभावी होणारी परवड पाहता गावातील मुलांना लग्नासाठी कोणी पोरीही देईनात अशा अवस्थेत जगायचं कसं? असा प्रश्‍न सध्या कराड तालुक्यातील 6 वाड्यांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्याने वाड्यातील तलाव आणि विहिरीतील पाणीसाठे कोरडे पडले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेनासा झाला आहे.

सध्या एप्रिल महिन्यातच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हामुळे विहिरी कोरड्या पडल्या असून कराड तालुक्यातील बामणवाडी, वानरवाडी, चाळकेवडी, शिबेवाडी, कारंडेवाडी, खड्याचीवाडी या सहा वाड्यांमध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे.

Karad Tanker

शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि पिकासंबंधी माहिती मिळवायची असेल तर हॅलो कृषी हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि सरकारी योजना, आपल्या पिकाच्या दराची माहिती घ्या. याव्यतिरिक्त Hello Krushi वर तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोफत मध्ये मिळते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करून मोबाईल मध्ये Install करा. आणि वेगवेगळ्या कृषी योजनांचा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1252644905457980

कराड तालुक्यातील बामणवाडीसह या गावातील लोकसंख्या जवळपास अडीच हजार इतकी आहे. या ठिकाणी वर्षातील तीन महिने पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. उन्हाळा सुरू झाला कि, अगदी लहान शेंबड्या मुलांपासून ते ऐंशी वयाचे वयोवृद्ध हातात हंडा घेऊन पाण्यासाठी विहिरी आणि टँकरभोवती गर्दी करतात.

Karad Taluka Village

या भागातील पाणी स्त्रोत असलेल्या विहीरी आटलेल्याने आता गेल्या एक महिन्यापासून येथील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर बनला आहे की वाड्यातील मुलांना कोणी लग्नासाठी मुलगी देण्यासही तयार नाही. पवारवाडीत तर शासनास पैसे देऊन पाणी घ्यावे लागत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.