कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून आज सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाचा तडाका वाढल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
धरण व्यवस्थापनाने दिलेली माहिती अशी, सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये 1 हजार 50 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर सिंचनाची मागणी वाढल्यामुळे आज बुधवारी दि. 22 रोजी सायंकाळी 5:00 वा कोयना धरणाचे नदी विमोचक उघडून 1 हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले. सध्या कोयना धरणातून एकुण विसर्ग 2 हजार 50 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरण व्यवस्थापनाने सोडलेल्या पाण्यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. कोयना धरण हे 105 टीएमसी पाणीसाठा क्षमतेचे आहे. सध्या पाणी पातळी: 2 हजार 133′ 06″ असून पाणीसाठा: 73.10 टीएमसी इतका आहे. वाढत्या उन्हामुळे व ऊस तोडणी झाल्याने सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे.