WazirX ने ड्रग्स ट्रेडच्या आरोपांना दिला नकार ! कोण आहे तो Crypto King जो बिटकॉइन द्वारे ड्रग्सचा व्यापार करीत होता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बिनान्सच्या (Binance) मालकीच्या भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वजीरएक्स (WazirX) वर प्लॅटफॉर्मद्वारे ड्रग्सच्या व्यापारास (Drugs Trade) प्रोत्साहित केल्याचा आरोप आहे. असा आरोप केला जातो की, ड्रग्स पेडलर मकरंद पी आदिविरकर, ज्याला क्रिप्टो किंग म्हणून ओळखले जाते, त्याने WazirX सारख्या क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरुन भारतातील अनेक ड्रग्स डीलर नेटवर्कला पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्या. तथापि, WazirX ने हे आरोप फेटाळून लावत म्हटले की, क्रिप्टो किंग अर्थात मकरंद आदिवलीकर त्यांचा क्लायंट नाही. WazirX म्हणाले की,” मकरंदने त्यांचा प्लॅटफॉर्म वापरला नाही. अमली पदार्थांच्या खरेदीसाठी ड्रग वापरणाऱ्यांना बिटकॉइन सारखी क्रिप्टोकरन्सी पुरवणाऱ्या मकरंद आदिवलीकर यांना मुंबई नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) मंगळवारी अटक केली.

NCB ने सांगितले की, मकरंद गेल्या दोन वर्षांपासून ड्रग्सच्या पेमेंट साठी WazirX सारखे प्लॅटफॉर्म वापरत होता. नोव्हेंबर 2020 मध्ये NCB ने महाराष्ट्रातील एका गावातून 20 LSD चे ब्लॉट्स ताब्यात घेतले तेव्हा हे उघडकीस आले. असा आरोप आहे की, मकरंदने स्वत: LSD, एमडीएमए, हेरोइन, हायड्रोपोनिक विड आणि मिथची युरोपमधून तस्करी केली आणि इतर ड्रग्स डीलर्सना तस्करीमध्ये मदत केली.

म्हणूनच मकरंदला Crypto King का म्हणतात ?
युरोपमधून LSD सारखी औषधे खरेदी करण्यासाठी डार्क नेटवर केवळ क्रिप्टोकरन्सी वापरले जातात. ड्रग्ज पेडलर बिटकॉइनसाठी मकरंदकडे जात असत. NCB ने सांगितले की, मकरंद पेडलरकडून रोख पैसे घेत असत आणि कमिशन कमी केल्यावर ड्रग पेडलरला बिटकॉइन देण्यासाठी त्याचे वॉलेट वापरत असे, ते पेडलर्स ड्रग्स खरेदी करण्यासाठी वापरत असत. याच कारणास्तव, मकरंदला मुंबईचे ड्रग पेडलर आणि ड्रग्स घेणारे Crypto King या नावाने ओळखले जाऊ लागले.

WazirX ने NCB ला ‘हे’ उत्तर दिले
11 जून रोजी WazirX ला NCB कडून एक ई-मेल मिळाला. ज्यात असा आरोप केला जात आहे की, मकरंदने या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचा उपयोग ड्रग्स ट्रेडसाठी केला होता. कंपनीने म्हटले आहे की,” जेव्हा आम्ही आमचे रेकॉर्डस् तपासले तेव्हा आम्हाला कळले की, Crypto King आमच्या प्लॅटफॉर्मचा युझर नाही. आम्ही आमचे उत्तर NCB ला पाठवले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment