Wednesday, June 7, 2023

WazirX मीम करन्सी शिबा इनू विकत घेणाऱ्यांच्या नुकसानीची करणार भरपाई, युजर्सचे नुकसान कसे झाले हे जाणून घ्या

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वजीर-एक्सWazirX) ने मिम करन्सी शिबा इनू (SHIB) च्या खरेदीत नुकसान झालेल्या युजर्सना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. शिबा इनू एक्सचेंजवर 13 मे 2021 रोजी त्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा (Actual Value) अधिक किंमतीला लिस्ट (List) केले गेले. युजर्सना याचा त्रास सहन करावा लागला. त्याच दिवशी, इथेरियम (Ethereum) ब्लॉकचेनचे संस्थापक व्हिएटलिक बुटरिन यांनी भारताच्या कोविड-क्रिप्टो रिलीफ फंडाला Covid-Crypto Relief Fund) 50 लाख कोटींपेक्षा जास्त शिबा आणि 500 इथर कॉईन दिले.

कमतरतेमुळे डिपॉझिट आणि पैसे काढण्यासाठी लागला वेळ
लिस्टिंगच्या एका तासाच्या आत शिबाची किंमत 1 रुपयांपेक्षा कमी झाली. अशी बातमी आहेत की, लिस्टिंगच्या वेळी शिबाची किंमत 0.00002 डॉलर होती, जी सुमारे 0.0016 रुपये आहे. तथापि, वजीर-एक्सने किंमत 3 रुपये लिस्ट केली होती. किंमतीतील या फरकामुळे अनेक युजर्सनी नुकसान झाल्याची तक्रार केली होती. वजीर-एक्स म्हणाले की,” शिब लाइव्ह झाल्यावर गडबडींमुळे, डिपॉझिट आणि पैसे परत काढण्यासाठी अधिक वेळ लागला. यासह SHIB च्या मार्केटमध्ये लिक्विडिटीचा अभाव दिसून आला. जास्त लोकांच्या ट्रेडिंगमुळे आणि लिक्विडिटी अभावी SHIB च्या किंमती वाढल्या.

युजर्सना मिळतील नुकसानीच्या बरोबरचे वजीर-एक्स युटिलिटी टोकन
वझीर-एक्सने सांगितले आहे की,” आमच्या टीमने लवकरच हा गोंधळ सुधारित केला. आमच्या ग्राहकांकडून येणाऱ्या नवीन डिपॉझिट्सनुसार SHIB ची किंमत ऑटो एडजस्ट केली गेली. वजीर-एक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निश्चल शेट्टी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,” जास्त किंमत देऊन शिब खरेदी करणार्‍यांचे नुकसान झाले आहे आणि जे विक्री करणार नाहीत त्यांना एअरड्रॉप डब्ल्यूआरएक्सद्वारे परतफेड केली जाईल. ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुढील चार महिन्यांत वजीर – एक्स युटिलिटी टोकन मिळतील. हे टोकन युजर्सना होणार्‍या नुकसानीच्या बरोबरीची असतील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group